भोसरीतील मंगेश हाडके यांच्या घरचे इको फ्रेंडली बाप्पा
Pckhabar- भोसरीतील दै. सामनाचे पत्रकार मंगेश हाडके यांच्या घरी इको फ्रेंडली गणरायाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
याबाबत पत्रकार मंगेश हाडके म्हणाले, आमच्या घरी आज बाप्पाचे उल्हासमय वातावरणात आगमन झाले. कोरोनाचे महाकाय संकट असले तरी गणरायाच्या आगमनाच्या उत्साहात तसुभरही कमी नव्हती. श्री गणेशाची विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. आता पुढील सात दिवस गणराय आणि गौराई च्या सहवासात खऱ्या अर्थाने चैतन्य निर्माण होईल. कोरोनाचे हे संकट विघ्नहर्ता नक्कीच दूर करेल.










Leave a Reply