Vadgaon News : वेटलिफ्टींग स्पर्धेत वडगाव मावळ महाविद्यालयाचे यश

Vadgaon News : वेटलिफ्टींग स्पर्धेत वडगाव मावळ महाविद्यालयाचे यश
Pckhabar- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगाव मावळ येथील कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वजनी गटात झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोहित बबन पडवळ (७१कि) प्रथम क्रमांक, यश नवनाथ पडवळ (९४ कि) प्रथम क्रमांक, सौरभ मारुती जाधव (११०कि) प्रथम क्रमांक असे घवघवीत यश मिळवले
या यशाबद्दल प्राचार्य अशोक गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला. संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व प्राध्यापकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *