डॉ. भारती चव्हाण यांचे ‘पद्म भुषण’ साठी नामांकन

डॉ. भारती चव्हाण यांचे ‘पद्म भुषण’ साठी नामांकन
Pckhabar- महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणासाठी तसेच सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासासाठी राज्यात अग्रेसरपणे सामाजिक काम करणार्‍या ‘मानिनी फाऊंडेशनच्या’ संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांचे ‘पद्म भुषण’ पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे.  
      डॉ. चव्हाण यांचे महिला सक्षमीकरण तसेच कामगार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आहे. कोरोना कोविड-19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अ‍ॅन्टी कोरोना टास्क फोर्स’ (एसीटीएफ) या राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या सामाजिक संस्थेच्या त्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा आहेत. तसेच राज्यातील गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या माध्यमातून अध्यक्षा डॉ. चव्हाण यांनी गुणवंत कामगारांचे संघटन उभारले व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली.
     डॉ. चव्हाण यांच्या या उल्लेखणीय कार्याची दखल घेत त्यांच्यातील नेतृत्वगुण, संपर्क व संघटन कौशल्य, जिद्द, चिकाटी विचारात घेऊन त्यांच्यावर एसीटीएफच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांचा सामाजिक कार्याचा आलेख आणखीच उंचावत गेला. त्यांच्या या कार्याचे देशभर कौतुक होऊ लागले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *