Maval News : मदन बाफना
राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
Pckhabar- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मदन बाफना यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मदन बाफना आमच्यासाठी आदर्श आहेत असे असे गौरवोद्गार माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी काढले. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मदन बाफना यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून वडगाव मावळ येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळा भेगडे हे होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता पडवळ, महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, कृष्णाजी कारके, पोटोबा महाराज देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, माजी नगरसेवक किशोर भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,
ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, नंदकुमार कोतुळकर, बारकू ढोरे, नंदू धनवे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना, संचालक प्रल्हाद जांभुळकर, दत्तात्रय असवले, किसन कदम, राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल राऊत, विशाल वहिले, सुनील नाना भोंगाडे, प्राचार्य प्रा. अशोक गायकवाड, डॉ. अनिता धायगुडे,
हिरामण लंघे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व मावळ तालुक्यातील कार्यकर्ते, संस्थेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.










Leave a Reply