Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सात खेळाडूंची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सात खेळाडूंची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
Pckhabar- महाराष्ट्र स्टेट एन्ड्युरन्स स्केटिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ नुकतीच मुंबईतील विरार रोलर स्केटिंग रिंग येथे संपन्न झाली. या स्पर्धेत देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सात स्केटर्सनी सहभाग घेतला आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली.

या स्पर्धेत ६ वी तील विराज प्रशांत मोलावाडे याने ३ सुवर्णपदके मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. ५ वी तील श्लोक संदीप थिटे याने २ रौप्यपदके जिंकली, तर ३ री तील समर्थ हनुमंत सुळ याने ३ कांस्यपदकांची कमाई केली. तसेच २ री तील आयुष अनिल नारखेडे याने देखील एक कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत वरद निवास पाटील, सौमित्र निलेश गायकवाड आणि अभिनव योगेश गमे या खेळाडूंनीही आपापल्या गटात अंतिम फेरीत प्रवेश करून प्रभावी कामगिरी केली.

या विजेत्यांची निवड दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी खोपोली येथे होणाऱ्या राष्ट्रीय एन्ड्युरन्स स्केटिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ साठी झाली आहे. या सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षक आश्रफ शेख यांचे सृजन फाउंडेशनचे सर्व सदस्य व शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी विशेष अभिनंदन करीत राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *