Dehu News : स्कोडा फोक्सवॅगन ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटचे अध्यक्ष अमृत दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त देहूत वृक्षरोपण
pckhabar- स्कोडा फोक्सवॅगन ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटचे विद्यमान अध्यक्ष श्री अमृत दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्कोडा फोक्सवॅगन मित्र परिवारातर्फे वृक्षदाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून देहू येथे वृक्षरोपण करण्यात आले.
या ठिकाणी आपले देशी वृक्ष वड ,पिंपळ ,अर्जुन ,चिंच असे वेगवेगळे वृक्ष लावण्यात आले
या ठिकाणी वृक्षदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरपूर देवस्थान समितीचे विश्वस्त ह भ प शिवाजी महाराज मोरे यांनी सामाजिक कार्य व पर्यावरण किती महत्त्वाचे आहे हे सर्व ग्रुपला समजावून सांगितले व तसेच प्रत्येकाने आपले वाढदिवस केक कापून व पार्ट्या करून साजरे करण्यापेक्षा असे सामाजिक कार्य करून साजरे करावेत असे मार्गदर्शन महाराजांनी केले.
व वृक्षदायी संस्थेचे सभासद श्री सुभाष पाटील यांनी वृक्षदाई संस्था कशा प्रकारे कार्य करते हे समजून सांगितले.











Leave a Reply