Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा
Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि. १४ ते १६ डिसेंबर २०२४ या तीन दिवसांच्या कालावधीत क्रीडा महोत्सव अतिशय उत्साह व जोश पूर्ण वातावरणात संपन्न झाला. ५० मी. व १०० मी. धावणे, तीन पायांची शर्यत, अडथळा शर्यत, रस्सीखेच इ. स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या या दिवसात घेण्यात आल्या.

क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. मा. संजीव पवार व मा. प्रा. धन्यकुमार उपाध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

अग्नि, जल, पृथ्वी, वायू या चारही संघांमध्ये खेळांचे सामने आयोजित करण्यात आले होते. इ. पाचवी व सहावी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच इ. तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी AEMS ही शाळेच्या अद्याक्षरांची निर्मिती करित उपस्थितांची दाद मिळविली. इ. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गांनुसार ड्रील व शर्यतींचे सादरीकरण केले.
शाळेत गेले तीन दिवस विद्यार्थ्यांनी जल्लोषात क्रीडा महोत्सव साजरा केला. क्रीडा स्पर्धांमध्ये विजेते झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे व पदके देऊन गौरविण्यात आले.
सन २०२४-२५ चा सर्वोत्कृष्ट संघ म्हणून पृथ्वी संघाला गौरविण्यात आले. इ. सहावी तील रणवीर चव्हाण आणि ऐश्वर्या कवडे यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी उपस्थित होत्या.
क्रीडा शिक्षक अश्रफ शेख, मायकेल डेविड, प्रतिक पांचाळ व सीमा भोसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खेळांचे उत्तम प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका निशा गावडे, अस्मिता शिरालकर, प्रज्ञा मेहेर व पूनम ढाकोळ यांनी केले. तर क्रीडा शिक्षक अश्रफ शेख यांनी आभारप्रदर्शन केले.










Leave a Reply