तळेगाव दाभाडेमध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह उत्साहात

तळेगाव दाभाडेमध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह उत्साहात
Pckhabar- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग दिंडाेरी प्रणित यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडेमध्ये अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

तळेगाव दाभाडे, समर्थनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमाेर दि. 9 ते दि. 16 डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह संपन्न झाला. यानिमित्त आठ दिवस सामुदायिक गुरूचरित्र वाचन, श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक, पुजा, भुपाळी आरती, नैवेद्य आरती, विशेष याग, स्वामी चरित्र आणि दुर्गा सप्तशती वाचन, ग्राम अभियान अंतर्गत 18 विभागांचे मार्गदर्शन, औदुंबर प्रदक्षिणा, नित्यध्यान, गीतेचा 15 वा अध्याय आणि विष्णूसहस्त्रनाम वाचन असे विविध दैनंदिन कार्यक्रम झाले.

त्याचबराेबर नित्यस्वाहाकार, श्री गणेश याग, मनाेबाेध याग, गीताई याग, श्री स्वामी याग, श्री चंडी याग, श्री रूद्र याग, मल्हारी याग, बलि पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

गुरुचरित्र पारायणाला 1 हजार 800 सेवेकरी सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रविवारी (दि.15) श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.  सोमवारी (दि.16) सकाळी 7 वाजता सत्यदत्त पूजन, 10:30 वाजता सप्ताह सांगता नैवैद्य आरती संपन्न झाली.

त्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश काकडे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन झाले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. महाप्रसादाचा सुमारे पाच हजार भाविकांनी लाभ घेतला.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *