Dehu News : *अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थिनींनी केले अनोखे रक्षाबंधन*
pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थीनींनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनोखे रक्षाबंधन साजरे करित परंपरेचा वारसा जोपासला.

श्रीक्षेत्र देहूतील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान संचलित वारकरी शिक्षण संस्थेत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा महाराष्ट्रातील सर्वच भागातील जवळजवळ ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देहूतीलच संत तुकाराम महाराज विद्यालयात ही मुले शिक्षण ही घेत आहेत. सन २००० पासून ही वारकरी शिक्षण संस्था कीर्तनकार, प्रवचनकार घडविण्याचे कार्य मोठ्या निष्ठेने करीत आहे. रक्षाबंधन या सणानिमित्त वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना आपल्या गावी जाणे जमत नाही, म्हणूनच या मुलांनाही रक्षाबंधन सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इ. ६ वी तील विद्यार्थिनींनी हा अनोखा रक्षाबंधन उपक्रम राबविला.
इ.६ वी तील विद्यार्थीनींनी या वारकरी शिक्षण संस्थेतील ३५ मुलांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण खऱ्या अर्थाने साजरा केला. विद्यार्थिनींनी आपल्या या दादांचे छान औक्षण करुन समाजहिताची जबाबदारी आपण दोघे मिळून पार पाडण्याचे वचनच जणू यावेळी एकमेकांना दिले. यावेळी वारकरी संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. मुलींनाही यानिमित्ताने आनंद देणाऱ्यांमध्ये सामील होऊन या सुंदर आनंदसोहळ्याचे साक्षीदार होता आले.
या रक्षाबंधन सोहळ्याप्रसंगी देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, देवस्थानचे विश्वस्त मंडळी, संत विष्णुदास हभप नामदेव महाराज ढवळे तसेच मार्गदर्शक शिक्षक गाडेकर महाराज उपस्थित होते.










Leave a Reply