Chinchwad News : नेत्रतज्ञ डॉ राजेंद्र लाहोरे यांचा ‘कार्यभूषण पुरस्कारा’ने सन्मान
Pckhabar- सांगवी, पिंपळे गुरव येथील नेत्रतज्ञ डॉ राजेंद्र शिवप्रसाद लाहोरे यांना, राष्ट्रीय शिक्षण मंडळ संचलित टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे मानाचा ‘कार्यभूषण पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. प्रदान करण्यात आला आहे.
पुणे येथील सुप्रसिद्ध टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक आणि इतर क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केले असेल त्यांना कार्यभूषण हा पुरस्कार दिला जातो. डॉ. राजेंद्र शिवप्रसाद लाहोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सांगवी पिंपळे गुरव परिसरात नेत्ररोग तज्ञ म्हणून आपली वैयक्तिक सेवा देत आहेत.
याशिवाय आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणुन पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्यांनी शेकडो निःशुल्क नेत्ररोग शिबिरांमध्ये आपली सेवा दिली असून,पालखी सोहळ्यात देखील दरवर्षी वैद्यकीय सेवा चश्मेवाटप या सेवेत ते सहभागी होत असतात.
याशिवाय आपल्या नेत्ररोग सेवेव्यतिरिक्त नेत्ररोग तज्ञांची अखिल भारतीय संघटना “टास”* द असोसिएशन ऑफ शलाकी (टास) महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष तसेच राष्ट्रीय उपसचिव ( joint सेक्रेटरी) या पदावर ते कार्यरत आहे.
द असोसिएशन ऑफ शालकी तर्फे २०१६ पासून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या सिनर्जी ह्या नॅशनल आणि internataional कन्फरसेंसेसच्या आयोजनात डॉ लाहोरे यांचा सिंहाचा वाटा असतो.
शिक्षणाची आवड आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड म्हणून त्यांनी डॉक्टरीपेशा करत असताना आपण समाजाची काही देणे लागते या उद्देशाने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. याशिवाय सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोसिएशनच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग शिवाय स्मार्ट युनिटी हेल्थकेअर एलएलपी या डॉक्टरांच्या सहभागातून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणुनही ते कार्यरत आहेत.
वैद्यकीय ,सांस्कृतिक, आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपला व आपल्या शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांचाही नावलौकिक प्राप्त केलेल्या डॉ. राजेंद्र शिवप्रसाद लाहोरे यांच्या या बहुआयामी कार्यासाठी त्यांना टिळक आयुर्वेद महाविद्यालयातर्फे आयोजित वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा
कार्यभूषण पुरस्कार प्राप्त झाला.
राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दि. प्र.पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये डॉ. मनोज नेसरी , सल्लागार ,आयुष मंत्रालय यांच्या हस्ते डॉ लाहोरे यांना सन्मानित करण्यात आले .










Leave a Reply