Dehu News : विद्यार्थ्यांना शिक्षा करताना ती शिक्षणाशी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी पूरक ठरावी : शिवव्याख्यात्या ॲड. सीमा तरस
Pckhabar- विद्यार्थ्यांना शिक्षा करताना ती शिक्षा शिक्षणाशी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी पूरक ठरावी असे मत सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या निमित्ताने शिवव्याख्यात्या ॲड. सीमा तरस यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवरायांना घडविण्यात जिजाऊ आऊसाहेबांचे फार मोठे योगदान आहे. आऊसाहेबांनी बाल शिवबांवर त्यावेळी योग्य सुसंस्कारांची पेरणी केली… म्हणूनच स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. स्वराज्यनिर्मितीसाठी सर्वात मोठा विरोध हा स्वकीयांकडून झाला. परंतू आऊसाहेबांच्या संस्कारांच्या मुशीने या विरोधालाही स्वराज्याच्या कामी लावण्याचे कसब होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत बाल शिवबाच्या लहानपणी आपल्या सवंगड्यांसोबत घडलेली एक घटना ॲड.सीमा तरस यांनी सांगितली. जंगलात राहणाऱ्या एका आडदांड पोराला आऊसाहेबांनी शिक्षा न करता त्याच्या अंगी असणारे आवाजाचे सुप्त गुण हेरून पुढे बहिर्जी नाईक जन्मास घातला.
विद्यार्थ्यांनाही शिक्षा करताना त्या त्यांच्या आयुष्यातील प्रगतीला पूरक ठरल्या पाहिजे आणि विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेशी आजीवन जोडला गेला पाहिजे असे मत ॲड. सीमा तरस यांनी यावेळी मांडले. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी उपप्राचार्या सौ.शैलजा स्वामी मॅडम तसेच इतर शिक्षक वर्गही उपस्थित होता. सहशिक्षिका सौ.वृषाली आढाव यांनी आभार व्यक्त केले.










Leave a Reply