Dehu News : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा लोकमतकडून विशेष सन्मान

Dehu News : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा लोकमतकडून विशेष सन्मान

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते गौरव

अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा नावलौकिक

Pckhabar- लोकमत समुह, पुणे तर्फे द हयात रेजेन्सी,नगर रोड, पुणे येथे आयोजित “लोकमत अचिव्हर्स” या विशेष सन्मान सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलला गौरविण्यात आले.

दरवर्षी लोकमत कडून व्यावसायिक, सामाजिक, कला, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान केलेल्यांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते श्रीक्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा गौरव करण्यात आला.

यावेळी दै.लोकमतचे संपादक श्री. डॉ. संजय आवटे यांनी संस्थेच्या उपक्रमशील कार्याचे कौतुक केले. जेष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे व जेष्ठ तबलावादक पद्मश्री डॉ. विजय घाटे इ.मान्यवर या सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे सचिव प्रा. विकास कंद, शाळेच्या उपप्राचार्या सौ. शैलजा स्वामी, सहशिक्षिका सौ. वृषाली आढाव व सौ. निलिमा अहिरराव यांनी प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार स्वीकारला.

शाळेला लाभलेला हा पुरस्कार प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांसाठी आत्मियतेने कष्ट घेणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, शाळेस सहकार्य करणारे पालक व विद्यार्थी यांच्या अनमोल योगदानाचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार निश्चितपणे जबाबदारी वाढविणारा आहे. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विधायक परिवर्तन घडविण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणा देणारा आहे असे मत संस्थेचे सचिव प्रा विकास कंद यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *