Chikhali News : विकास अनाथ आश्रमातील मुलांना शूज, एक दिवसाचे राशन वाटप
Pckhabar- रविवार म्हंटले की, प्रत्येकजण आपआपल्या परिवारासोबत फिरायला जातात, मूव्ही पाहायला जातात व आनंददायी वातावरणामध्ये सुट्टीचा दिवस पार पाडतात. पण प्रत्येकाच्या वाट्याला हा आनंद नसतो.
अनाथ आश्रमामध्ये असणाऱ्या मुलांना प्रत्येक दिवस हा सारखाच असतो. ना ते कुठे फिरायला जाऊ शकतात , ना कुठे सनासमारंभाला चांगली कपडे घालू शकतात. याचाच विचार करून विशाल व्हिरोळकर याने चिखली येथे असलेल्या विकास अनाथ आश्रमास भेट देवुन तेथे मुलांना लागणाऱ्या वस्तूंची चौकशी केली. त्यातून असे लक्षात आले की, १८ मुलांना शूज आणि सॉक्सची कमतरता आहे.
तर रविवारी विशालने मित्रांसमवेत आश्रमास भेट देवून शूज, सॉक्स व एका दिवसाचे राशन वाटप केले. त्या मुलांचा आनंद पाहण्यास्पद होता. मग त्यांचा सोबत जेवण केले. त्यांच्याशी गप्पा मारल्या.
आश्रमास भेट दिली असता मुलांचे संस्कार, वागणे, अभ्यास, काम पाहून खूप छान वाटले. याचे सर्व श्रेय बबन हटकल सरांना जाते. तुम्ही केलेल्या कामाचा अभिमान आहे सर…
या सेवेच्या कार्यात आपले अध्यक्ष अमृतदादा दरेकर यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून त्या मुलांसमवेत गप्पागोष्टी केल्या, त्यांनी सगळ्यांसोबत जेवणही वाढले. अमृतदादा आणि उपस्थित असलेल्या मित्रपरिवाराने सेवेच्या कार्याबद्दल उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.











Leave a Reply