Nanded News : स्केटिंग रिंग, व्हॉलीबॉल मैदान, वाॅकिंग ट्रॅकचे काम दर्जेदार करा ; माजी नगरसेवक प्रशांत तिडके-पाटील यांची मागणी
नवनियुक्त आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची माजी नगरसेवक प्रशांत तिडके-पाटील यांनी घेतली भेट
Pckhabar – बाबानगर भागात दोन कोटी 85 लाख रुपये खर्चाच्या स्केटिंग रिंग, व्हॉलीबॉल मैदान ट्रॅकचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे काम दर्जेदार कसे होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत तिडके-पाटील यांनी नवनियुक्त आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेऊन केली.
डोईफोडे यांची नुकतीच नांदेड महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. डोईफोडे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर माजी नगरसेवक प्रशांत तिडके-पाटील यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच विविध विकास कामांचा संदर्भात चर्चा केली.
आनंदनगर ते महात्मा फुले रस्त्यावर बाबानगरचे मैदान आहे. या मैदानावर स्केटिंग रिंग, व्हॉलीबॉल मैदान आणि वाॅकिंग ट्रॅकचे काम चालू आहे. महापालिकेच्या निधीतून होणारे हे काम पूर्व नियोजित होते. सध्या हे काम वेगात सुरू आहे. त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंग तयार करण्याचे नियोजन असले तरी हे काम अगदी धातूरमातूर पद्धतीने केले जात आहे असे प्रशांत तिडके यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
आयुक्तांनी बाबानगर येथे आकाराला येत असलेल्या स्केटिंग व व्हॉलीबॉल मैदान आणि वॉकिंग ट्रॅकचे काम दर्जेदार व मजबूत होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत तिडके-पाटील यांनी केली आहे.











Leave a Reply