Dehu News : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मोफत औषधोपचार केंद्र

 

Dehu News : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मोफत औषधोपचार केंद्र

आई हॉस्पिटल आणि आई मेडिकल समोर केंद्र सुरू

Pckhabar – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आई हॉस्पिटल आणि आई मेडिकल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, देहू, व्हिॲक इंडिया प्रा. लि. आणि प्रभावी मूल्यवर्धक शिक्षण प्रसारक मंडळ विशाल इंगळे यांच्या सौजन्याने दि. 9 ते दि. 11 या कालावधीत मोफत औषधोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

देहू-आळंदी रोडवरील जैन मंदिरासमोरील आई हॉस्पिटल व आई मेडिकल समोर मोफत औषधोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या मोफत केंद्रावर भाविकांची तपासणी करण्यात येत असून विविध आजारांवर औषधे देण्यात येत आहेत.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आज सायंकाळी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने देहूत दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *