शहरात आज 1131 नवीन रुग्ण, 371 जणांना डिस्चार्ज, 21 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1105 आणि पालिका हद्दीबाहेरील 26 अशा 1131 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 38 हजार 821 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 371 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज शहरातील 17 आणि पालिका हद्दीबाहेरील 4 अशा 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये निगडी (पुरुष 52 वर्षे) आकुर्डी (पुरुष 54 वर्षे,पुरुष 55 वर्षे) चिंचवड (पुरुष 33 वर्षे, पुरुष 62 वर्ष) मोशी (पुरुष 62 वर्षे) वल्लभनगर (पुरुष 66 वर्ष) जुनी सांगवी (स्त्री 54 वर्षे, स्त्री 73 वर्षे) चिखली (पुरुष 63 वर्षे, 45 वर्षे,पुरुष 66 वर्षे) थेरगांव (स्त्री 60 वर्षे) मासुळकर कॉलनी (पुरुष 78 वर्षे) कासारवाडी (पुरुष 54 वर्षे,पुरुष 55 वर्षे) अजमेरा (स्त्री 73 वर्षे) कल्याण(स्त्री 61 वर्षे) खेड (पुरुष 54 वर्षे) जुन्नर (स्त्री 60 वर्षे) सोमाटणे (स्त्री 72 वर्षे) येथील रहिवासी आहेत.
शहरात आजपर्यंत 38 हजार 821 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 25 हजार 770 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 736 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 145 अशा 881 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6631 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.










Leave a Reply