Pimpri News : शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त एक दिवसीय कार्यशाळा

Pimpri News : शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त एक दिवसीय कार्यशाळा

प्रेरणा कौशल्य विकास, LCP निगडी व स्पेक्ट्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा

Pckhabar – विद्या विकास प्रशाला कासारवाडी येथे शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त “5 S Technique -Adhere to and Feel the change ” या विषयावर प्रेरणा कौशल्य विकास,LCP निगडी व स्पेक्ट्रम यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.

लायन प्रभाकर नाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले व त्यांनी कार्यशाळेचे औपचारिक उदघाटन केले.
या प्रसंगी प्रेरणा कौशल्य विकास संस्थापक लायन उषा येवले यांनी डॉ हांडे लिखित, विज्ञानावर आधारित पुस्तकांचा संच संचालक लायन कांचन भोसले यांच्याकडे सुपूर्त केला.

5 S Technique या विषयावर लायन अशोक येवले यांनी मार्गदर्शन केले.
१६ शिक्षक व २० पालकांनी यात सहभाग नोंदविला. हा उपक्रम वर्षभर चालू ठेवून शाळेत आमूलाग्र बदल घडविण्याचे ध्येय संस्थेचे चेअरमन लायन राजेंद्र भोसले यांनी मनासी बाळगले आहे. त्याला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *