
Dehu News : देहूत आई लाकडी घाण्याचे उद्घाटन
कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात
लाकडी घाण्याचे तेल महाग आहे म्हणण्यापेक्षा तेल फायदेशीर आहे याचा विचार करा : डॉ. योगेश लोहार
Pckhabar- जोडोनिया धन ! उत्तम व्यवहारे या तत्त्वावर चालणाऱ्या देहूगाव येथील जगद्गुरू स्वयंसहाय्यता समूहाने आई मेडिकलच्या यशस्वी वाटचालीनंतर जागतिक आरोग्यदिनाच्या औचित्य साधून आई लाकडी घाण्याचे उद्घाटन करण्यात आले. कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच भारतातील तेल बियांचे उत्पादन वाढले त्यानंतरही रिफाईड तेल आयात करावे लागते. पामतेल पूर्वी खात नव्हते. मात्र, ते शरीराला अपायकारक आहे. आरोग्याचा हिशोब करून लाकडी घाण्याचे तेल महाग असले तरी आरोग्याचा हिशोब करून लाकडी घाण्याचे तेल दररोजच्या जीवनात वापरावे, असे आवाहन डॉ. योगेश लोहार यांनी केले.
देहूगाव येथील जगद्गुरू महिला बचतगट देहू संचालित आई लाकडी घाण्याचे भैरवनाथ चौकाजवळील जॉय नेस्ट स्कूल समोर महिला संचालकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी
लाकडी घाण्याच्या व्यवसायात यशस्वी भरारी घेणाऱ्या सोनाली तापकीर यांनी ‘लाकडी घाण्याच्या तेलाचे आरोग्य विषयक फायदे’ याविषयी तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आशाताई जगताप, अर्चनाताई घुंडरे यांनी ‘महिला सक्षमीकरण’ याविषयी मार्गदर्शन केले.
दरम्यान, लाकडी घाण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल अशोक चव्हाण यांचा पोलिस उपनिरीक्षक उमेश कारके यांच्या हस्ते सत्कार सत्कार करण्यात आला. यावेळी बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आशाताई जगताप, अर्चनाताई घुंडरे म्हणाल्या ” बचत गटासाठी पुरूषाचा पाठिंबा देखील महत्वाचा आहे. स्वतः तेल बनवून स्वतः साठी वापरणार, हे चांगले उदाहरण आहे. आई नावातच सगळं आले. गटाचे फायदे आणि गुणांची प्रचिती येते.
यशस्वी उद्योजिका सोनाली तापकीर म्हणाल्या ” लाकडी घाण्याचे तेल हे नवीन गोष्ट नाही. या व्यवसायातून शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
तेल बिया शेतकऱ्यांकडून घेऊन त्यांनाच पेंड आपण देऊ शकतो.
प्रत्येक व्यवसायात अडचणी येत असतात, त्याप्रमाणे मलाही अनेक अडचणी आल्या. न डगमगता अडचणींचा सामना केला प्रशिक्षण घेतले.
तापकीर पुढे म्हणाल्या, रिफाईड तेलातून महत्वाचा घटक काढून घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक गावात- गावात लाकडी घाणे सुरू झाले पाहिजे. भारतात सर्वाधिक जास्त तेलाची आयात होते. हे आयात कमी नसून बंदच झाले पाहिजे, अशी अपेक्षा तापकीर यांनी व्यक्त केली. तसेच
लाकडी घाण्याचे तेल 9 महिने ते एक वर्ष चांगले राहते. दिवसा तेल काढल्यास उत्पादन चांगले मिळते.
अडीच किलो शेंगदाणे वापरल्यानंतर एक लिटर तेल निघते. तेल महाग असले तरी लाकडी घाण्याचे तेलाचे महत्व महिलांनीच महिलांना तेलाचे महत्व सांगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. योगेश लोहार म्हणाले, भारतातील तेल बियांचे उत्पादन वाढले त्यानंतरही रिफाईड तेल आयात करावे लागते. पामतेल पूर्वी खात नव्हते. मात्र, ते शरीराला अपायकारक आहे. आरोग्याचा हिशोब करून लाकडी घाण्याचे तेल वापरावे, महाग असले तरी दररोजच्या जीवनात लाकडी घाण्याचे तेल अत्यंत आवश्यक आहे.
आपले पूर्वज लाकडी घाण्याचे तेल वापराचे त्यामुळे त्यांना प्रथिने मिळायचे.
करडईचे तेल तुपाबरोबर दर्जाच्या आहेत. शेंगदाणे, करडई, खोबरेल तेल, मोहरी तेल, सूर्यफूल तेल खाण्यास योग्य असून दरमहा तेल आलटून- पालटून खावे. या तेलातील विविध घटक असतात, ते शरीरासाठी योग्य आहे. शेंगदाणे तेलाबद्दल विविध गैरसमज आहेत. शरीरातील प्रत्येक अवयवासाठी कोलेस्टेरॉल लागते. कोलेस्टेरॉल अपायकारक नाही. ही एक चुकीची संकल्पना आहे. अति तिथे माती असते. प्रमाण वाढल्यानंतर ते हानिकारक असते. कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात घेतल्यास ते औषधा सारखे असते. तेलाच्या वासावरून आणि जाडीवरून तेलाचे दर्जा कळतो. स्निग्ध पदार्थ किती खातो, हे महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीला 2000 हजार कॅलरी लागतात. दिवसात 15 ते 20 एमएल तेल गरजेचे असल्याचे डॉ. योगेश लोहार म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसाद खामकर आणि स्वातीताई खामकर यांनी केले.











Leave a Reply