उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची बदली, कौस्तुभ दिवेगावकर नवे जिल्हाधिकारी
Pckhabar- उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची राज्य सरकारने आज (गुरुवारी) बदली केली आहे. त्यांच्या जागी पुण्यातील भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी कोरोना काळात जिल्ह्यात चांगले काम केले होते. लॉकडाउनमध्ये जिल्ह्यातील रुग्णसंख्या अतिशय कमी होती. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. अनलॉकमध्ये जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव करण्यासाठी जिल्हाधिकारी मुंडे यांनी चांगले काम केले आहे.
राज्य सरकारने आज त्यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी पुण्यातील भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती केली आहे. नवीन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्यासमोवर जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पोहचलेला कोरोना, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे.










Leave a Reply