Sad News : उपशिक्षिका वंदना पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ही बातमी शेअर करा.

Sad News : उपशिक्षिका वंदना पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Pckhabar- देहूगाव येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या उपशिक्षिका वंदना नारायण पवार यांचे बुधवारी (दि. 1) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 55 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे निवृत्त मुख्याध्यापक नारायण पवार, दोन मुली असा परिवार आहे.

वंदना पवार यांच्यावर सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगांव येथे गुरुवारी सकाळी अंत्यविधी करण्यात आला आहे.  यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


ही बातमी शेअर करा.