खासगी रुग्णांलये बिलांसाठी तुमची अडवणूक करताहेत; येथे संपर्क साधा

 

खासगी रुग्णांलये बिलांसाठी तुमची अडवणूक करताहेत; येथे संपर्क साधा
आमदार जगताप यांचे आवाहन  

Pckhabar-  पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांवर उपचार केल्यानंतर बिलांसाठी रुग्णांची अद्यापही पिळवणूक सुरूच आहे. त्यामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयांकडून बिलांसाठी पिळवणूक आणि अडवणूक होत असेल, तर शहरातील नागरिकांनी डॉ. सतीश कांबळे (7507411111) यांच्याशी तसेच covidpcmc205gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. येथे संपर्क केल्यानंतर संबंधित नागरिकांची बिलांसंदर्भात असणार्‍या तक्रारीचे निश्चितपणे समाधान केले जाईल, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले आहे.

यासंदर्भात आमदार  जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाने कोविड-19 साथ रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, कोरोना विषाणू कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू केल्याची अधिसूचना निर्गमित केलेली आहे.  खासगी रुग्णालयांना काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच कोरोना आजार आणि अन्य आजारांवर उपचार केल्यानंतर किती खर्च घेण्यात यावा, हेही या कायद्यात सुस्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचार खर्च घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र खासगी रुग्णालये आजही गोरगरीब रुग्णांची बिलांसाठी नाहक पिळवणूक करत असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा गोरगरीब रुग्णांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
ही लूट होऊ नये आणि गोरगरीब रुग्णांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी शहातील कोणत्याही खासगी रुग्णालयात बिलांसाठी पिळवणूक किंवा अडवणूक होत असेल, तर संबंधित नागरिकांनी डॉ. सतीश कांबळे (7507411111) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

तसेच covidpcmc205gmail.com या ई-मेलवर मेल केल्यास तुमच्याशी   संपर्क साधून समस्या जाणून घेण्यात येईल. संपर्क केलेल्या नागरिकांनी रुग्णालयांसाठी बिलासंदर्भात केलेल्या तक्रारीचे निश्चितपणे समाधान केले जाईल, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *