’कोरोना सोबत जगताना’ फोटोग्राफी स्पर्धेत ’या’ फोटोला प्रथम क्रमांक
Pckhabar- जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या ‘कोरोना सोबत जगताना’ या फोटोग्राफी स्पर्धेमध्ये खुला गटामध्ये अजय जयस्वाल तर महिला गटामध्ये सतेजा राजवाडे यांनी प्रथम क्रमांक मिळाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त्त दि. 10 ते 17 ऑगस्ट 2020 दरम्यान आयोजित केलेल्या फोटोग्राफी स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड व पुणे शहरांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आदी शहरांतून 550 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या स्पर्धेसाठी कोरोना सोबत जगताना या विषयाला अधोरेखित करणार्या 354 छायाचित्रांमधून खुला गट व महिला गट यांमधून प्रत्येकी 5 विजेते निवडण्यात आले.
खुला गटातून प्रथमेश नौगण यांना द्वितीय, महिंद्र कोल्हे यांना तृतीय, प्रदिप कोलेकर व अभय बलकवडे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे. तर महिला गटामध्ये सुखदा तांबे यांना द्वितीय, ऐश्वर्या सराफ यांना तृतीय, सुरेखा भोसले व अनुजा गुजर यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे.
या स्पर्धेसाठी फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर व महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आर्टिस्ट कम फोटोग्राफर विलास साळवी यांनी परिक्षक म्हणून काम पहिले.










Leave a Reply