Dehu News : संत जिजाबाई कन्या विद्यालयात विद्यार्थिनींसाठी कलचाचणी, करिअर समुपदेशन कार्यशाळा

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या संत जिजाबाई कन्या विद्यालय येथे रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी कलचाचणी व एक दिवसीय करिअर समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे समुपदेशक श्री. पराग शिवदास सर यांनी उपस्थित विद्यार्थिनींना दहावीनंतरच्या मुलींसाठी विविध क्षेत्रातील करिअरच्या वाटा आणि परीक्षा काळातील ताणतणाव व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी विभाग बाह्य व्याख्यान प्रमुख सौ.आगरकर मॅडम व गुरुकुल प्रकल्प प्रमुख श्री.तांबे एस. आर यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तांबे ए.के ,मुख्याध्यापिका सौ. वडाळकर एस. एम यांनी अभिनंदन केले.










Leave a Reply