Dehu News : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरास उद्योजक विजय बोत्रे परिवाराकडून चांदीच्या पादुका अर्पण

Dehu News : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरास उद्योजक विजय बोत्रे परिवाराकडून चांदीच्या पादुका अर्पण

Pckhabar- विश्ववंदनीय, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरची आषाढी व कार्तिकी वारीची अखंड परंपरा असणाऱ्या श्रीक्षेत्र येलवाडी येथील अधिक उद्योग समूहाचे प्रमुख श्री विजय सदाशिवराव बोत्रे परिवाराच्या वतीने पाच लाख रुपयांच्या चांदीच्या पादुका मोरारी बापू यांच्या हस्ते विधिपूर्वक अर्पण करण्यात आल्या.

विश्ववंदनीय, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चतुःशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने तत्कालीन राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या मंदिराचा लोकाअर्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता. श्रीक्षेत्र पंढरपूरची आषाढी व कार्तिकी वारीची अखंड परंपरा असणाऱ्या श्रीक्षेत्र येलवाडी येथील अधिक उद्योग समूहाचे प्रमुख श्री विजय सदाशिवराव बोत्रे परिवाराच्या वतीने या शिळा मंदिरासाठी पाच लाख रुपयांच्या चांदीच्या पादुका मोरारी बापू यांच्या हस्ते विधिपूर्वक अर्पण करण्यात आल्या.

या सोहळ्यासाठी अभिमत डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब काशीद, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीनमहाराज मोरे, हभप अजयमहाराज मोरे, हभप माणिकमहाराज मोरे, हभप शिवाजीमहाराज मोरे, हभप संजयमहाराज मोरे, हभप संतोषमहाराज मोरे, देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रल्हाद मोरे, येलवाडीचे सरपंच रणजित गाडे, उद्योजक शंकर बोत्रे, कैलास मोरे व श्री विजय सदाशिवराव बोत्रे परिवाराचे सदस्य व आप्तेष्ट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *