Dehu News : प्राणायाम व योग शिबीराचा प्रारंभ

Dehu News : प्राणायाम व योग शिबीराचा प्रारंभ


Pckhabar- प्राणायाम व योग शिबीराचा श्रीक्षेत्र देहूचे नगराध्यक्षा स्मिता चव्हाण आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाजन यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

महाराजांच्या पवित्र भुमीत व भगवान श्री हनुमानाचे आशीर्वादाने योग शिबीराची सुरुवात होऊन भसे सरांचे आयोजनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळी लवकर उठून साधक देहूच्या पवित्र वातावरणात श्री निफाडकर सरांचे सुश्राव्य असे अनमोल शब्द अनुभवण्यासाठी जमले होते.

उत्साही वातावरणात आजपासून योग शिबीराची सुरुवात झाली व उद्या आणखी काय अनुभवण्यासाठी मिळेल याची उत्सुकता निर्माण होऊन आजचे शिबीर आनंदाने साजरे झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *