Pathrud News : पाथरूडमधील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘वुमन स्पेशल डे’

Pathrud News : पाथरूडमधील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘वुमन स्पेशल डे’

Pckhabar- भूम तालुक्यातील पाथरूड येथील  फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी ‘वुमन स्पेशल डे’ चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांमध्ये महिला प्रोत्साहनपर व्याख्यान, हळदीकुंकू तसेच मैदानी स्पर्धाचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मुमताज शेख यांनी औद्योगिक क्षेत्रात आपले वेगळी ओळख निर्माण केली.

रेखा हराळे ग्रामसेवक यांचे व्याख्यान महिलांना प्रोत्साहन करणारे झाले.  तसेच महिलांना वेगवेगळ्या खेळात सहभाग घेऊन या खेळाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमासाठी महिलांनी, माजी शिक्षिका यांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड. विलास पवार, संस्थेचे सदस्य दत्तात्रय सोनार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली टाळके मॅडम यांनी केले. आभार वैशाली टाळके मॅडम यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शाळेचे मुख्याध्यापक श्री बापू खांडेकर सर, सहशिक्षिका श्रीमती अर्चना खुणे मॅडम , श्रीमती पुनम बोराडे मॅडम ,कुमारी सोनाली खुणे मॅडम , श्रीमती सत्यभामा मुंडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *