Dehu News : पारंपारिक उद्योगाला फाटा देत जगद्‌गुरू महिला बचत गटातर्फे मेडिकल सुरू

Dehu News : पारंपारिक उद्योगाला फाटा देत जगद्‌गुरू महिला बचत गटातर्फे मेडिकल सुरू

आई मेडिकलचे मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर ज्येष्ठ महिलांच्या हस्ते उद्‌घाटन

Pckhabar- महिला बचत गट म्हटले की आगबरत्ती, मेणबत्ती, पापड, लोणची तयार करणे असे पारंपारिक उद्योग सुरू केले जातात. मात्र, देहूगावातील जगद्‌गुरू महिला बचत गटाने पारंपारिक उद्योगांना फाटा देत वैद्यकिय सारख्या अत्यावश्यक क्षेत्रात पाऊल टाकत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे जगद्‌गुरू महिला बचत गटाचे कौतूक केले जात आहे.

देहू-आळंदी रोडवरील मोरया कॉम्प्लेक्स, कंद पाटील नगर, जैन मंदिराजवळ आई हाॅस्पिटल व जगद्‌गुरू महिला बचत गटाने आई मेडिकल सुरू केले आहे.   मेडिकलचे उद्‌घाटन मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रविवार (दि.15) रोजी बचत गटातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बचत गटातील मोठ्या संख्येने महिला व त्यांचे पती उपस्थित होते.

देहूगाव आणि परिसरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरूणांनी नवीन काही तरी सुरू करण्याचा ध्यास घेऊन दिड वर्षांपूर्वी बचत गटाची स्थापना केली. बचत गटाची मुळात संकल्पना जुनी असली तरी पारंपारिक व्यवसायांना फाटा देत नवीन प्रयोग राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार बचत गट यातील काही सदस्य वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने सुरूवातीला मेडिकल सुरू करण्याचा विचार आला. जेणेकरून गटातील प्रत्येक सभासदाला अल्प दरात औषधे आणि त्यातून उत्पन्न ही संकल्पना मांडण्यात आली. या संकल्पनेनुसार गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मेडिकल सुरू होण्यासाठी बचत गटातील काही सभासद विविध कागदपत्रे, परवानगी घेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. त्यांच्या या अथक परिश्रमातून रविवारपासून मेडिकल व्यवसायाला सुरूवात झाली आहे. त्यामुळेच बचत गटाने पारंपारिक व्यवसायाला फाटा देत नवीन व्यवसाय स्थापन करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल याचे मोठे कौतूक होत आहे. त्यामुळेच सुरूवातीला 60 सभासद असलेला हा गट आता 100 सभासदांचा झाला आहे.

जगद्‌गुरू महिला बचत गटाची वाटचाल ही सामाजिक बांधिलकी जोपासत सुरू आहे. त्यामुळे सर्व सभासदांनी एक संघता, ऐक्‍य, एकोपा ठेवून वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  महिलांना बचत गट सुरूवात करून देण्याच्या उद्देशाने सर्व महिलांच्या पतीने मोठे परिश्रम घेतले आहे. यापुढे बचत गटाच्या मार्फत विविध व्यवसाय सुरू करण्याचा मानस सभासदांकडून व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *