Dehu News: शिष्यवृत्ती परीक्षेत संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची उत्तुंग भरारी

Dehu News: शिष्यवृत्ती परीक्षेत संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची उत्तुंग भरारी

अनुष्का साप्ते प्रथम, स्नेहल काळे, द्वितीय, ओवी पिसे तृतीय

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेचे, संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू येथील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील मुलींनी घवघवीत यश संपादन केले असून तीन मुली जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या आहेत.

अनुष्का रामदास साप्ते 248 गुण मिळवून विद्यालयात प्रथम, स्नेहल ज्ञानदेव काळे 244 गुण मिळवून द्वितीय तर ओवी जितेंद्र पिसे 242 गुण मिळवून तृतीय क्रमांकावर आलेली आहे.

यशस्वी विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वडाळकर एस. एम., पर्यवेक्षक श्री. तांबे ए. के. शिष्यवृत्ती विभागप्रमुख श्री माने बी. आर, सौ. आडकर ए. डी, श्रीम. गवारी व्ही. एस., श्रीम. रोकडे एस. एस. व स्थानिक स्कुल कमिटी सदस्य व देहूगांव ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *