Article By Dr Ankush jadhav: संकल्प नव्या वर्षाचे
Pckhabar- जगभर कुठे जा, सामान्यतः मानवी प्रवृत्ती/मन हे जवळपास सर्वत्र सारखेच असते.हे आजवर अनेक प्रकारांतून, माध्यमांतून दिसून आले आहे. वास्तविक दरवर्षी एक वर्ष संपून दुसरे वर्ष येत असते. ही नियमित चालणारी एक क्रिया आहे. परंतु दरवर्षी गेल्या वर्षात झालेल्या चुका या नव्या वर्षात करायच्या नाहीत अशी मनाची तयारी करून नव्या उमेदीने, नवीन उत्साहाने नव्या वर्षात करायच्या संकल्पांची तयारी ही आदल्या वर्षातच सुरू केलेली असते. तसे पाहिले तर दरवर्षी केले जाणारे संकल्प जवळपास जगभर सारखेच असतात.
स्टॅटिका कंझुमर सर्व्हे या अमेरिका स्थित संस्थेने 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जो सर्व्हे केला. त्या सर्व्हे चे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. त्या नुसार क्रमशः संकल्प –
१)नियमित व्यायाम करणार-५२%
२)आरोग्यपूर्ण आहार घेणार-५०%
३)जास्त असलेले वजन कमी करणार-४०%
४)अधिक बचत करणार-३९%.
५)कुटुंब व मित्रांसोबत अधिक वेळ घालविणार-३७%.
६)सोशल मेडिया वर जास्त वेळ घालविणार नाही-२०%.
७)कामात येणार ताण कमी करण्याचा प्रयत्न करणार-१९%.
८)चैनीसाठी खर्च करणार नाही-१९%.
(सौजन्य -लोकमत).
या संकल्पांवर नजर टाकली तर लक्षात येईल की, हेच संकल्प सर्वत्र केले जातात. आपण आजूबाजुंच्या लोकांचा अंदाज घेतला तरी त्यांनी व आपण ही हेच संकल्प केलेले असतात व करतो. असे संकल्प दरवर्षी नव्या उत्साहात अमलात आणले जातात व एक दोन आठवड्यात सोडले ही जातात. पुढे काही दिवसांत आपण असे संकल्प केले होते हे ही विसरून जातो.
नव्या उत्साहाने भरपूर व्यायाम केला जातो व अंग फार दुखतंय म्हणून “आज नको , उद्या करू”म्हणून उद्या वर ढकलतो. तो पुढे ढकलून विसरूनच जातो. कारण उद्या कधी येतच नाही.
वास्तविक संकल्प करायचे ते हळूहळू अंमलात आणायचे असतात. कोणतीही गोष्ट उत्साहाच्या भरात एकदम करायला जायचे नसते. संकल्प करून ते अंमलात आणण्यात आपलेच हित असते.
वरील संकल्प तसे अंमलात आणणे अजिबात कठीण नाहीत, फक्त यासाठी हवी जिद्द, मनापासून ती करण्याची तयारी. मनापासून एखादी गोष्ट करण्याचे मनावर घेतले तर ती निश्चित पूर्ण हाऊ शकते. मानवी जीवनात मनाला अत्यंत महत्व आहे. मनापासून निश्चय केला तर कोणतीही गोष्ट साध्य हाऊ शकते.
काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर हे मनाचे सहा दोष आहेत.
जे डोळ्यांना दिसत नाही परंतु तेच आचार-विचार ठरवते. ते कधी भूतकाळात तर क्षणात भविष्यकाळात घेऊन जाते. ते एक व्यक्तिमत्व-माणूस घडविणारे आहे. संकल्प करायला लावणारे व त्या संकल्पना पासून परावृत्त करायला लावणारे ही मनच आहे. म्हणूनच मनावर थोडेफार तरी नियंत्रण करायला शिकले पाहिले /आले पाहिजे.
मंदिर तक पहुंचना तन का विषय है, लेकिन संकल्प तक पहुंचना मन का विषय है।
अनेक थोर,मोठ्या,प्रसिद्ध लोकांच्या चरित्रांचे/ आत्मचरित्रांचे अध्ययन केले तर दिसून येईल त्यांनी त्या त्या क्षेत्रांत संकल्प, निश्चय करून ,त्या प्रमाणे वाटचाल करून च यश मिळविले आहे.
डॉ. अंकुश जाधव
लेखक,भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सेवानिवृत्त सहायक संचालक व प्रसिद्ध लेखक आहेत.










Leave a Reply