Dehu News : आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
श्री संत तुकाराम महाराज मंदिरात कार्यक्रम संपन्न

देहूगाव : संतभूमी देहूचे आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे व प्रथम उपनगराध्यक्ष रसिका स्वप्निल आप्पा काळोखे यांच्या वतीने तयार केलेल्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संत तुकाराम महाराज संस्थांनचे अध्यक्ष ह. भ. प.नितीन महाराज मोरे, माजी अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, प्रा. प्रदीप कदम, ह. भ. प. संतोष महाराज काळोखे, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते आज (गुरुवार) करण्यात आले.
देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.
नितीन महाराज मोरे म्हणाले, ”या दिनदर्शिकेमध्ये महिलांबद्दलचा कृतज्ञता भाव, अध्यात्मिक बाबी, संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे कार्यक्रम आणि पालखीची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. आध्यात्मिक कॅलेंडर कसे असावे याचा आदर्श स्वप्निल आप्पा यांनी मांडला आहे.”

यावेळी प्रास्ताविक करताना प्रा. प्रदीप कदम यांनी या दिनदर्शिका बनवण्या मागची ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांची उत्तुंग झेप याबाबत माहिती आणि स्वप्निल आप्पा यांची भूमिका विशद केली.
यावेळी नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष शितल हगवणे, संतोष महाराज काळोखे, माणिक महाराज मोरे, जयेश महाराज मोरे, मधुकर महाराज मोरे, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनीही स्वप्निल आप्पा आणि रसिका काळोखे यांच्या बद्दलच्या भावना आणि त्यांचे वेगळेपण सांगितले.
उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, देहू नगर पंचायतीचे नगरसेवक आणि नगरसेविका व स्वप्निल आप्पा काळोखे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
सूत्रसंचालन स्वप्निल मधुकर काळोखे यांनी केले. आभार स्वप्निल आप्पा काळोखे यांनी मानले.










Leave a Reply