Dehu News : राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त  संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची शेत शिवारास भेट

Dehu News : राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त  संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची शेत शिवारास भेट

Pckhabar – देहूगाव येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शुक्रवारी शिक्षक आणि विद्यार्थिनींनी निवृत्त कृषी अधिकारी व प्रगतशील शेतकरी श्री.गायकवाड  यांच्या शेतशिवारास क्षेत्रभेट दिली.

क्षेत्रभेटीदरम्यान 28 एकरावरील श्री.गायकवाड यांच्या शेतातील पिकांचे प्रकार, फळबागा व्यवस्थापन, जलसिंचन व्यवस्था  इत्यादी माहिती विद्यार्थिनींनी घेतली. याप्रसंगी शेतकऱ्याचा प्रत्यक्ष बांधावर जाऊन सत्कार करण्यात आला.

क्षेत्रभेटीचे नियोजन इयत्ता 9 वी च्या वर्गशिक्षिका श्रीम.कुंभार मॅडम, गुरुकुल प्रमुख श्री.तांबे एस आर यांनी केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.तांबे ए.के व मुख्याध्यापिका सौ.वडाळकर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *