Dehu News : सोनं पिकवणाऱ्या मातीच्या प्रती श्रद्धा म्हणून देहूत “दर्श वेळा अमावस्या” साजरी
Pckhabar- काळ्या आईच्या(मातीच्या) उपकारातून उतराई होण्याचा कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणजे वेळ अमावस्या. सोनं पिकवणाऱ्या मातीच्या प्रती असलेली श्रद्धा आणि निष्ठा अशा पद्धतीच्या सणांमधून प्रेरणा मिळते.
प्रथमतः पुण्यातील देहू नगरीत दर्श वेळा अमावस्या साजरी करण्यात आली . मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात वेळ अमावास्या (यळवस) साजरी केली जाते परंतु नोकरीला असल्याने गावी जाता येत नाही मग मनात कुठेतरी असं वाटायच की याही वर्षी मागच्या वर्षी प्रमाणे येळवस साजरी करावी त्या प्रमाणे मित्र मंडळी मध्ये चर्चा झाली आणि बघता बघता ४० फॅमिली एकत्र येऊन येळवस साजरी केली .
बच्चेकंपनी नी झोक्याचा, मिकी माऊसचा आनंद घेतला तर महिला मंडळीनी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या खेळाचा आनंद घेतला. (भाऊजी चा रोल अनील देसाई यांनी खूपच छान केला) व महिलांनी गप्पांच्या मैफिली रंगवल्या . नंतर भज्जी ,भाकरी, गोड भात ,आंबील ,अशा प्रकारे वन भोजनाचा आस्वाद घेतला .
या कार्यक्रमात युवा उद्योजक महेश भाऊ डोंगरे, डॉ किशोर यादव सर (आरोग्य केंद्र देहुगाव), अभिमन्यू पवार (संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र), चंद्रकांत नाना शेळके (कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड) #skodavolkswagen# युनियन चे कार्यक्षम अध्यक्ष अमृत दादा दरेकर, प्रवीण हंबीर (स्कोडा ऑटो फॉक्स्वागेन युनियन जनरल सेक्रेटरी)शरद होळकर (स्कोडा ऑटो फोक्सवॅगन युनियन उपाध्यक्ष) यांनी सपत्नीक हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .
या कार्यक्रमाचे आयोजन बालाघाट युवा मित्र परिवार पुणे या ग्रुप चे कार्यकर्ते श्री हणमंत ढगे , नितीन बनसोडे , विलासराव बोराडे, संदीप गिरी, दत्ता धोंडगे, बळीराम माळी, प्रमोद ईगे, महादेव कुमठेकर,किरण पवार, दौलत वाकुरे,शिवाजी लाकाळ, गोविंद मजगे,राजीव छिद्रे, सचिन सांगळे, महादेव आदमाने, विठ्ठल अटक, ज्ञानेश्वर शिंदे, दत्ता भोजणे, धोंडू तात्या वाढवणे,हानमंत झील, गजानन तावरे,कैलास लोंढे, कैलास वाघमारे,तेजेश उल्ले, बाळासाहेब टाकेकर , ज्ञानेश्वर जाधव, देविदास रोडे, सिद्धार्थ कदम,प्रकाश राऊत, सुधाकर पवार,भिमा सागावे, संतोष कोरणूळे, सुभाष भुसणे,अतिक सय्यद, ज्ञानेश्वर चव्हाण, बालाजी चव्हाण, महेश अकनगिरे, सचिन टेकले, अशोक शेळके, बाळासाहेब अंबड, विठ्ठल घोरबांड,चामले धम्पाल यांनी अतिशय सुंदर केले .











Leave a Reply