स्वच्छ सर्वेक्षणात तळेगाव दाभाडे शहराचा आठवा क्रमांक
Pckhabar- स्वच्छ भारत 2020 च्या सर्वेक्षणात तळेगावदाभाडे शहराची मोठी सुधारणा झाली आहे. यंदा शहराचा आठवा क्रमांक आला आहे. गतवर्षी शहर 56 व्या क्रमांकावर होते.
50 हजार ते 1 लाख लोकसंख्या या विभागात तळेगावदाभाडे शहराचा समावेश होता. जानेवारीत हे सर्वेक्षण झाले होते. पश्चिम विभागातील स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड असे पाच राज्य होते. त्यात कराड शहर पहिले लोणावळा शहर दुस-या क्रमांकावर आले आहे. तर, तळेगावदाभाडे शहराचा आठवा क्रमांक आला आहे. गेल्यावर्षी शहराचा 56 वा क्रमांक होता.
यावर्षी त्यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे. आरोग्य समिती सभापती सुलोचना आवारे यांनी शहर स्वच्छतेसाठी चांगले काम केले आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे शहराच्या क्रमांकावरुन दिसून येत आहे.
”नागरिकांचा प्रतिसाद, कर्मचा-यांचे कष्ट, पदाधिका-यांनी सहकार्य केले. शहरातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था प्रत्येकांनी यासाठी योगदान दिले आहे. यामुळे सर्वेक्षणात शहराचा स्थर उंचावण्यात मोठी मदत झाली”, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (सीओ) दिपक झिंजाड म्हणाले.










Leave a Reply