Mumbai News : नव ऊर्जा फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांना शासनाचे मोफत जेष्ठ नागरिक ओळखपत्र, ब्लँकेट वाटप

Mumbai News : नव ऊर्जा फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांना शासनाचे मोफत जेष्ठ नागरिक ओळखपत्र, ब्लँकेट वाटप

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम

Pckhabar- नव ऊर्जा फाऊंडेशन यांच्या वतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त 23 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे मोफत जेष्ठ नागरिक ओळखपत्र आणि ब्लँकेट वाटप करण्यात आले होते.

मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना गटनेते आमदार अजय चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान जेष्ठ नगरिकांना ओळखपत्रा करिता लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये सवलत देण्यात यावे असे निवेदन पत्र ही देण्यात आले.

सदर पत्र देताना संस्थेचे विश्वस्त धनश्री राजन विचारे, प्रमुख सल्लागार सिद्धेश जयसिंग भोसले, अध्यक्ष स्वप्नील चंदने, सचिव अभिषेक शिंदे, खजिनदार सचिन कसाबे व संस्थेचे सदस्य जयेश मेहता, लंकेश चव्हाण, सागर चंदने उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये दगडू दादा सकपाळ, गजानन चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी दिव्या घाडीगावकर, सचिन पडवळ, जयसिंग भोसले, रुपाली चांदे, सुदाम परब यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *