Pcmc Tax Department News : मिळकत करासंदर्भात काही प्रश्न पडलाय, थेट सहाय्यक आयुक्तांना विचारा

Pcmc Tax Department News : मिळकत करासंदर्भात काही प्रश्न पडलाय, थेट सहाय्यक आयुक्तांना विचारा

कर आकारणी व कर संकलन विभागाचा उद्या “करसंवाद”

सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती

Pckhabar- करदात्यांचे विविध प्रश्‍न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने उद्या शनिवारी (दि.26) रोजी “करसंवाद”चे आयोजन करण्यात आल्याची माहिती कर आकारणी व करसंकलन विभागाचे विभागप्रमुख सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.

शनिवारी सकाळी 11.30 वाजता हा करसंवाद ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. तसेच मालमत्ता धारक ऑफलाइनही महापालिकेतील कर संकलन विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहू शकतात.

करदात्यांचे विविध प्रश्‍न, त्यांना मालमत्ता करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंका, कर कशाप्रकारे लावला, चुकीची कर आकारणी केली आहे, मालमत्ता हस्तांतरण अशा विविध प्रश्‍नांची सोडवणूक या करसंवादच्या माध्यमातून सोडविण्याचा कर संकलन विभागाचा प्रयत्न असणार आहे.

सकाळी 11.30 वाजता फेसबुक, ट्विटर, युट्युब या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने हा करसंवाद होणार आहे. यावेळी करदात्यांना आपले प्रश्‍न विचारता येतील. या प्रश्‍नांची कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्यासह सर्व मंडलाधिकारी, प्रशासन अधिकारी “ऑन दी स्पॉट” प्रश्‍न सोडविणार आहेत.

ऑफलाइनही सुविधा उपलब्ध

ज्या नागरिकांना करसंवादला ऑनलाइन सहभागी होता येणार नाही, अशा नागरिकांचे कर आकारणी संदर्भात जे काही प्रश्‍न असतील त्यांनी महापालिकेच्या तळमजल्यावरील कर आकारणी व कर संकलन विभागाच्या कार्यालयात शनिवारी सकाळी 11.30 वाजता उपस्थित रहावे. यावेळी सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, सर्व मंडलाधिकारी, प्रशासन अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्‍नांचा जागेवरच निपटारा होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *