Pimpri News : शिंदे-फडणवीस सरकारने गोर- गरिबांची केली थट्टा

Pimpri News : शिंदे-फडणवीस सरकारने गोर- गरिबांची केली थट्टा

शासनाच्या पिशव्यामुळे दिवाळी किट वाटप रखडले; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांचा आरोप

Pckhabar-  गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शासनाकडून पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये धान्याचे किट देण्याची मोठा गाजावाजा करत घोषणा केली. मात्र, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पिशवी मधूनच किट वाटप करण्यात येणार असून रेशन दुकानदारांना अद्याप पिशव्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदारांनी पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळी किटचे अद्याप वाटपच सुरू केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केला आहे. तसेच दिवाळी सणाचा दुसरा दिवस असताना पिशव्यांमुळे किट वाटप न करून शिंदे-फडणवीस सरकारने गोर-गरिबांची थट्टा केल्याचेही काळभोर म्हणाले.

याबाबत काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकार 100 रुपयांच्या किटमध्ये रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल देणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 1 लाख 22 हजार 476 रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, शिधापत्रिकाधारकांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दिवाळीला सुरुवात होऊन दोन दिवस होत आले आहेत. असे असताना दिवाळी किट हे शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पिशवी मधूनच वाटप करावयाचा आहे.

त्यामुळे प्रसिध्दीसाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने गोर-गरिबांची एक प्रकारे थट्टा केली आहे. रेशन दुकानदारांनी सरकारच्या पिशव्यांची वाट न पाहता त्वरीत नागरिकांना दिवाळी किट वाटप करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *