Dehu News : भाऊबीजेनिमित्त माहेरच्या साडी उपक्रमासाठी अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहू येथील पालक व शिक्षिकांतर्फे १५० साड्या भेट

Dehu News : भाऊबीजेनिमित्त माहेरच्या साडी उपक्रमासाठी अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहू येथील पालक व शिक्षिकांतर्फे १५० साड्या भेट

Pckhabar- दिवाळीत भाऊबीजेनिमित्त वंचित समूहातील भगिनींना माहेरची साडी देण्यासाठी स्नेहालय परिवार, अहमदनगर व अभंग प्रतिष्ठान, देहू यांच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला अतिशय संवेदनशीलतेने प्रतिसाद देऊन देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल येथील पालक व शिक्षकभगिनींनी १५० साडी भेट देऊन या उपक्रमात आपला सहभाग घेतला.

अभंग इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिवाळी मेळ्याचे आयोजन करून या दिवाळी मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॉ.कविता अय्यर यांनी *स्नेहालय परिवारातील सदस्य श्री.किरीटी मोरे* यांना या साड्यांची भेट दिली. याशिवाय *अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून या दिवाळी मेळ्यातील सर्व नफा देणगी स्वरूपात स्नेहालय या संस्थेस दिला जाणार आहे.* सामाजिक बांधिलकीतून आयोजित होणाऱ्या या उपक्रमामध्ये शाळेतील पालक बंधू भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या प्रसंगी श्री.किरीटी मोरे सर यांनी अभंग प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे व अभंग इंग्लिश मिडियम स्कूलच्या सर्व पालक बंधू-भगिनींचे शिक्षकांचे, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या देहू गावातील सर्व नागरिक बंधू-भगिनींचे कौतुक केले. स्नेहालय संस्थेच्या समजकार्याची माहिती सर्व उपस्थितांना सांगितली. ही मिळालेली माहेरची साडी या महिला भगिनिसाठी केवळ नवे कापड नसते, तर ती जगण्याची उमेद आणि नवी आशा असते. यामुळेच आपल्या सर्वांचे सहकार्य हे या महिला भगिनींसाठी अतिशय अनमोल असणार आहे. माहेरची साडी या उपक्रमाची माहिती व स्नेहालयाचे कार्य सर्व उपस्थितांना सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *