Pune District News : उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव


Pune District News : उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Pckhabar- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे यांचा एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे सन्मान चिन्ह देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता वैद्यकीय मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अति मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे यांचा एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये उत्कृष्ट कामकाज असल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे सन्मान चिन्ह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *