Talegaon Dabhade News : तीन दिवसीय ‘महाआरोग्य शिबिराचे’ उद्घाटन

Talegaon Dabhade News : तीन दिवसीय ‘महाआरोग्य शिबिराचे’ उद्घाटन

Pckhabar- मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आज शुक्रवार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

या शिबीराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आजारांवरील तपासणी, उपचार, औषधे व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून त्यामुळे नागरिकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यातील नामांकित हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटरचे डॉक्टर्स व वैद्यकीय तंत्रज्ञ सेवेसाठी सज्ज असणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन सेवांचा लाभ घ्यावा.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार सुनील शेळके, माजी आमदार श्री.कृष्णराव भेगडे , माजी मंत्री श्री.मदनजी बाफना, उद्योजक श्री.शंकरराव शेळके, संत तुकाराम कारखाना उपाध्यक्ष श्री.बापूसाहेब भेगडे, माजी तालुकाध्यक्ष श्री.बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री.गणेश खांडगे, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.विजय सरनाईक, माजी सभापती श्री.बाबुराव वायकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष श्री.साहेबराव कारके, श्री.सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री.गणेश काकडे, माजी नगरसेवक श्री.दिलीप खळदे, श्री.अरुण माने, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, श्री.बाळासाहेब ढोरे, संजय गांधी समिती अध्यक्ष श्री.नारायण ठाकर, जेष्ठ पत्रकार श्री.अमीन खान, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सौ.शैलजा काळोखे, सौ.वीणा करंडे, श्री.आशिष खांडगे आदि.मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *