Talegaon Dabhade News : स्वामी समर्थांच्या पादुकांचे झाले जल्लोषात स्वागत…!


Talegaon Dabhade News : स्वामी समर्थांच्या पादुकांचे झाले जल्लोषात स्वागत…!

अग्निहोत्र करून ठिकठिकाणी झाल्या पूजा संपन्न…!
Pckhabar- तळेगाव दाभाडे येथे श्री स्वामी समर्थ पादुका पूजन सोहळा दिनांक ६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अक्कलकोट येथून पादुका येऊन तळेगाव दाभाडे त्याचबरोबर मावळ तालुक्यातील इतर गावांमध्येही पादुकांचे पूजन अतिशय भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यामध्ये सर्वांना अग्निहोत्र करण्याचे महत्त्व आणि आजच्या काळाची गरज नागरिकांना अनंत ब्रह्मे यांनी सांगितली.

६ दिवस पादुकांच्या निवासाची व्यवस्था अग्निहोत्र हाऊस येथे ॲड. गजानन निकाळे यांच्या वतीने करण्यात आलेली होती.चिन्मय पादुकांच्या पूजेची व्यवस्था तसेच नागरिकांना मार्गदर्शन अनंत ब्रह्मे, योगेश जोशी, श्रीकांत सरदेशमुख आणि वैद्य यांनी केले.

यामध्ये तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, मावळ तालुका खाणक्रश उद्योग संघाचे अध्यक्ष विलास काळोखे, देवराई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश खेर, तळेगावातील नागरिक ज्योती जुगधर, सतीश आगळे, गणेश चव्हाण, सुभाष गायकवाड, श्रीरंग शहाणे, तृप्ती काळोखे, सविता बेंद्रे, अभय पोतदार, ज्योती मुंगी, शोभा जोशी, ॲड. नेवशे, नेहा दाभाडे, सुधीर गुरव, राजाराम सावंत, जया यादव, लोणारी, चंदन कारके, प्रसाद कांबळे, शोभा जफरे, ॲड. भोगावडे, निलेश माहुलकर, सुरेश गायकवाड, घनश्याम लाख, हजारे, पिंगळे, गिरीश कांबळे, गणेश पवार, यशवंत पवार, उदय कुलथे, सचिन मुऱ्हे, संदीप मुऱ्हे, सुवर्णा मते, वृषाली कुलकर्णी, राजेश्वरी देशपांडे, संजय पुरणकर, मनीषा निकम, राजेश जाधव, मयूर शेटे, गणेश चांदणे, विश्वनाथ काळोखे, सुहास काळोखे, विश्वेश आवटी आणि तानाजी मराठे यांच्या घरी स्वामी पादुकांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

त्याचबरोबर सर्वांच्या वतीने अक्कलकोट येथे होणाऱ्या अन्नदानाच्या सेवेसाठी मदतही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *