Dehu News : भाऊबीजेनिमित्त माहेरच्या साडी या उपक्रमासाठी देहूगावातील शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे २५ साड्या भेट

Pckhabar- दिवाळीत भाऊबीजेनिमित्त वंचित समूहातील भगिनींना माहेरची साडी देण्यासाठी स्नेहालय परिवार, अहमदनगर व अभंग प्रतिष्ठान, देहू यांच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला अतिशय संवेदनशीलतेने प्रतिसाद देऊन देहू येथील शिरीषकुमार मित्र मंडळाने २५ साड्या भेट देऊन या उपक्रमात आपला सहभाग घेतला. शिरीषकुमार मित्र मंडळाचा देहूतील समाजकार्यात कायमच सक्रिय सहभाग असतो. विविध सेवाभावी उपक्रमाचेही सातत्याने मंडळाकडून आयोजन केले जाते. अभंग प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यात शिरीषकुमार मित्र मंडळाचे कायमच अनमोल सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी संत जिजामाता भजनी मंडळातील महिला भगिनी व देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष श्री.आनंदराव मोरे, श्री.सुधीर मोरे, श्री.संतोष मोरे,श्री. जयेश मोरे, श्री.गणेश हगवणे, श्री. प्रशांत सुतार,श्री. वैभव मोरे, श्री.विक्रम मोरे सर, श्री.हिरामण मोरे, श्री विजय निम्हण,श्री. मयूर भालेकर, श्री.अनिरुद्ध हिंगे, कु.प्रतीक मोरे आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व अभंग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.










Leave a Reply