Dehu News : भाऊबीजेनिमित्त माहेरच्या साडी या उपक्रमासाठी 20 साड्या भेट

Dehu News : भाऊबीजेनिमित्त माहेरच्या साडी या उपक्रमासाठी 20 साड्या भेट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,देहू, विठ्ठलवाडी, माळवाडी येथील शिक्षिकांनी 20 साड्या भेट

Pckhabar- दिवाळीत भाऊबीजेनिमित्त वंचित समूहातील भगिनींना माहेरची साडी देण्यासाठी स्नेहालय परिवार, अहमदनगर व अभंग प्रतिष्ठान, देहू यांच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला अतिशय संवेदनशीलतेने प्रतिसाद देऊन देहू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक भगिनींनी 20 साड्या भेट देऊन या उपक्रमात आपला सहभाग घेतला.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जढर सर व हगवणे सर यांनी या सेवाभावी सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक करीत दीपावली निमित्त निराधारांना आधार देणाऱ्या व त्यांच्या जीवनात आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाला सदिच्छा दिल्या. व आपल्या सर्व शिक्षिका भगिनींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला म्हणून त्यांचे मनापासून कौतुक केले.

याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून या उपक्रमासाठी देहूगावात साडी संकलनाचे कार्य सुरू आहे यास ग्रामस्थ बंधू-भगिनींकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *