Pune News : अदालतीमध्ये प्रलंबित नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हांधिकाऱ्यांचे आवाहन

Pune News : अदालतीमध्ये प्रलंबित नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हांधिकाऱ्यांचे आवाहन

Pckhabar- जिल्हा प्रशासनातर्फे दुसऱ्या बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहत फेरफारविषयक प्रलंबित नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनतेच्या कामकाजाचा निपटारा होणेचे दृष्टीने फेरफार अदालतीच्या वेळेस फेरफार अदालतीशिवाय जनतेच्या इतर कामकाजामध्ये ७/१२ मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे. संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्विकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे उत्पन्नाचे व इतर दाखले वितरीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

तरी फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडल अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *