Chinchwad News: माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

Pckhabar-पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्यावतीने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना देऊन गौरविण्यात आले.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या बाराव्या वर्धापनदिन कार्यक्रमात राजेंद्र जगताप यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते संतोष चव्हाण, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, अनिल गुंजाळ, श्रावणी चव्हाण, अभिषेक जवताप, पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे, सचिव संजय मगर, सहसचिव महेंद्र अडसूळ, कार्याध्यक्ष चित्रसेन भवार, सहकार्याध्यक्ष अमोल पांढरे, खजिनदार राजेश डेव्हिड, सह खजिनदार सॅमसंग चंदनशिव, महिला प्रमुख हेमा कोरबरी, शिल्पा भवार, माधवी सातपुते, उपाध्यक्ष राजेश जाधव, बाळासाहेब निकाळजे, अमीर शेख, मिठू पवार, के. डी. कड, गणेश गायकवाड, अभिजीत पुजारी, देविदास साठे, दिलीप घोडे, दादा साळवे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे म्हणाले, की माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आजपर्यंत समाजातील प्रत्येक घटकासाठी विशेषतः कलाकारांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य दखल घेण्याजोगे आहे. राजेंद्र जगताप यांच्या या कार्याची दखल घेऊन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना राजेंद्र जगताप म्हणाले, की आजपर्यंत कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करीत आलो आहे. आपल्या कामाची पिंपरी चिंचवड कलाकार संघाने दखल घेतली, यामुळे मी भारावून गेलो आहे. त्याचवेळी आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. कलाकारांना जिथे गरज भासेल, तिथे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यास मी बांधील आहे.










Leave a Reply