Article By Dr. Ankush Jadhav : चंद्राची शीतलता व निसर्गाची सुंदरता म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा

Pckhabar- पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा वा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. काही ठिकाणी हिला माडी पौर्णिमा, लोख्खी पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा असे ही म्हणतात. या दिवशी पाळावायच्या व्रताला “कोजागिरी व्रत”असे म्हणतात.असं म्हणतात की,महालक्ष्मी मध्यरात्री चंद्रमंडळातून खाली उतरून पृथ्वीवर येते. या दिवशी चंद्र 16 कलांमध्ये असतो.याच काळात निसर्ग हिरवागार असतो,मनप्रसन्न करणारे वातावरण असते.
याच दिवशी माता लक्ष्मी चा जन्म झाला आहे, असे मानतात.
या दिवशी चंद्र पृथ्वी च्या जवळ येतो. परिणामी चंद्राचा उजेड पृथ्वीवर जास्त प्रमाणांत पडतो. चंद्राचा हा उजेड शुद्ध, सात्विक, शीतल असतो. या उजेडात, चांदण्यात बसायला, फिरायला खूप प्रसन्न वाटते. कोजागिरीचे शीतल चांदण अंगावर घेतलं की, मनःशांती, मन:शक्ती व उत्तम आरोग्य लाभते.भीती,ताण-तणाव,नैराश्य कमी होण्यास मदत होते. चांदण्या रात्री फिरण्यात काय आनंद असतो तो वाचून समजणार नाही तर त्या साठी स्वतः फिरायला हवे. आता मोठं मोठ्या शहरात चांदण्या रात्रीचा अनुभव घेता येत नाही परंतु आज ही लहान शहरात,ग्रामीण भागात याचा अनुभव घेता येतो.
केवळ कोजागिरीच्याच दिवशीच नव्हे तर एकूणच चांदण्याच्या या उजेडात बसल्याने अनेक आजार बरे होतात असे मानले जाते. याच दिवशी भारतात बऱ्याच ठिकाणी दमा या आजारावर आयुर्वेदिक औषध दिले जाते. या दिवशी दम्यावर घेतलेले औषध जास्त लागू पडते असा समज आहे.
पावसाळ्याच्या गेल्या चार महिन्यात आकाश ढगालेले असते ते कोजागिरी पौर्णिमेपासून कमी होऊ लागते(आता केव्हाही पाऊस येऊ लागल्याने आकाश बरेच वेळा ढगालेलेच असते. ते सोडून). रात्रीच्या शीतल चांदण्यात चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविला जातो.त्या दुधात केशर,पिस्ता,बदाम,चारोळी,
जायफळ, वेलदोडे, साखर घातलतात.
गेली चार महिने हे वर्षा ऋतू चे असतात. आयुर्वेद शास्त्रानुसार या काळात शरीरात पित्त दोष वाढलेला असतो. कोजागिरी च्या शीतल चांदण्यात सुष्ट्रीतील व शरीरातील पित्त दोष कमी होण्यास मदत होते. चांदणे पित्त दोष कमी करणारे आहे. सुखा मेवा घालून आठवलेले दूध ही पित्त दोष कमी करणारे असून ते पौष्टिक आहे.चांदण्यात बसून हे दूध पितात.
काही लोक हा कार्यक्रम घरी तर बरेच लोक सार्वजनिकरित्या साजरा करतात. मौजमजा करतात. गाणी म्हणतात वा अन्य गोष्टींचे आयोजन करून तर काही लोक गप्पा मारत रात्रभर जागरण करून हा सण साजरा करतात.
डॉ. अंकुश जाधव
सेवानिवृत्त, सहायक संचालक, आयुष मंत्रालय, भारत सरकार.










Leave a Reply