Talegaon Dabhade News : कोजागिरीनिमित्त नाट्यपरिषदेच्या वतीने आज सायंकाळी ‘चंद्र आहे साक्षीला’ मैफिलीचे आयोजन 

Talegaon Dabhade News : कोजागिरीनिमित्त नाट्यपरिषदेच्या वतीने आज सायंकाळी ‘चंद्र आहे साक्षीला’ मैफिलीचे आयोजन

Pckhabar- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव शाखेच्या वतीने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. मधुमीत, मधुसूदन ओझा निर्मित व रजनीगंधा प्रस्तुत ही मैफिल आज (रविवार) सायंकाळी सात वाजता तळेगाव दाभाडे येथील भालेकर कॉलनीतील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या प्रांगणात होणार आहे. या मैफिलीचा तळेगावकर रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व कार्याध्यक्ष गणेश काकडे यांनी केले आहे.

या मैफिलीमध्ये गायक अमोल यादव, सुजाता जोशी, आर्या काकडे, मधुसूदन ओझा, पं. सुरेश साखवळकर, आणि सहकारी यांचे गायन होणार आहे. वादक संदेश खंडागळे, प्रवीण जाधव, चंद्रशेखर गायकवाड यांची साथसंगत असणार आहे. कार्यक्रमानंतर सर्व रसिकांसाठी दुग्धपानाचे आयोजन करण्यात आले आहे, याचा आस्वाद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *