Chinchwad News : पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप यांचा ‘समाजरत्न पुरस्कारा’ने गौरव
अभिनेत्री सुरेखा कुडची व ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर – काळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
Pckhabar- पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा समाजरत्न पुरस्कार यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ जगताप यांना अभिनेत्री सुरेखा कुडची, ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर – काळे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, अनिल गुंजाळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, श्रावणी चव्हाण, पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे, सचिव संजय मगर, सहसचिव महेंद्र अडसूळ, कार्याध्यक्ष चित्रसेन भवार, सहकार्याध्यक्ष अमोल पांढरे, खजिनदार राजेश डेव्हिड, सह खजिनदार सॅमसंग चंदनशिव, महिला प्रमुख हेमा कोरबरी, शिल्पा भवार, माधवी सातपुते, उपाध्यक्ष राजेश जाधव, बाळासाहेब निकाळजे, अमीर शेख, मिठू पवार, के. डी. कड, गणेश गायकवाड, अभिजीत पुजारी, देविदास साठे, दिलीप घोडे, दादा साळवे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड कलाकार संघांचे अध्यक्ष विजयकुमार उलपे प्रास्ताविक करताना म्हणाले, की शामभाऊ जगताप यांनी कोरोना काळात पिंपरी चिंचवडमधील कलाकारांना मोठी मदत केली आहे. कलाकारांच्या हाताला काम नव्हते, अशा वेळी केलेली ही मदत कलाकार कधीच विसरू शकत नाहीत. कलाकारांसोबतच गरजू नागरिकांना शामभाऊ जगताप यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मोठी मदत केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना शामभाऊ जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने आपणास समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल मी पिंपरी चिंचवड शहर कलाकार संघाचा मनापासून आभार मानतो. तसेच संघाच्या १२ व्या वर्धापन दिनास मी शामभाऊ जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने शुभेच्छा देतो. पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारीत वाढ झाली आहे.










Leave a Reply