Nigdi News : क्रांतीज्योत मित्र मंडळा तर्फे नवरात्र उत्साहात साजरी

Nigdi News : क्रांतीज्योत मित्र मंडळा तर्फे नवरात्र उत्साहात साजरी

Pckhabar- रुपीनगर येथील क्रांतीज्योत मित्र मंडळ आणि अमोलदादा भालेकर मित्र परिवार यांनी सालाबादप्रमाणे याहीवर्षी नवरात्र उत्सवाचे अतिशय उत्साहात आयोजन केले होते. सर्व गरबा आणि दांडिया खेळाडूंसाठी प्रशस्त असे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच मैदानाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. संपूर्ण ९ दिवस अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्धपणे सर्व खेळाडूंनी आणि नागरिकांनी नवरात्रीचा आनंद लुटला. सातव्या माळेला घारजाई माता मंदिरात मंडळातर्फे ढोलताशांच्या गजरात १५१ नारळांचे तोरण अर्पण करण्यात आले.

शिस्तीत आणि सुरक्षितपणे कार्यक्रम होणारे मंडळ अशी ख्याती असल्यामुळे लहान मुले आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. एकाच वेळी चालू असणारे गरबा आणि दांडियाचे ३ राउंड विशेष आकर्षण ठरले. मंडळातर्फे याहीवर्षी उत्कृष्ट खेळाडूंना विविध बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

तसेच सर्व महिला खेळाडूंना आणि उपस्थित महिला प्रेक्षकांना अमोलदादा भालेकर यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मंडळाने केलेले अचुक नियोजन आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडला.कार्यक्रम यशस्वी करण्यात क्रांतिज्योत मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दिनकर भालेकर,गोरख पाचपुते,आशिष मोटे,दर्पण येवले,सुयोग भालेकर यांनी सुत्रसंचालन केले.अमोल भालेकर यांनी सर्व महिला भगिनींचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *