Dehu News : भाऊबीजेनिमित्त माहेरच्या साडी उपक्रमास संत तुकाराम विद्यालयालच्या शिक्षिकांतर्फे 50 साड्या भेट

Pckhabar- दिवाळीत भाऊबीजेनिमित्त वंचित समूहातील भगिनींना माहेरची साडी देण्यासाठी स्नेहालय परिवार, अहमदनगर व अभंग प्रतिष्ठान, देहू यांच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला अतिशय संवेदनशीलतेने प्रतिसाद देऊन देहू येथील संत तुकाराम विद्यालय येथील शिक्षक भगिनींनी 50 साड्या भेट देऊन या उपक्रमात आपला सहभाग घेतला.
या प्रसंगी सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून ही मिळालेली माहेरची साडी या महिला भगिनिसाठी केवळ नवे कापड नसते, तर ती जगण्याची उमेद आणि नवी आशा असते. यामुळेच आपल्या सर्वांचे सहकार्य हे या महिला भगिनींसाठी अतिशय अनमोल असणार आहे. माहेरची साडी या उपक्रमाची माहिती व स्नेहालयाचे कार्य सर्व शिक्षकांना अभंग प्रतिष्ठानचे सदस्य विकास कंद व सचिन कुंभार यांनी सांगताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. यादव सर यांनी या सेवाभावी सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक करीत दीपावली निमित्त निराधारांना आधार देणाऱ्या व त्यांच्या जीवनात आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाला सदिच्छा दिल्या. आपल्या सर्व शिक्षिका भगिनींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला म्हणून त्यांचे मनापासून कौतुक केले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यादव सर, उपमुख्याध्यापिका सौ.कांबळे मॅडम व श्री.नारायण मोरे इनामदार उपस्थित होते. या साडी संकलन कार्यात शिक्षकांच्या माध्यमातून साड्या संकलन करण्यासाठी शिक्षिका सौ.विद्या घोरूडे यांनी प्रमुख सहभाग घेतला. अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून या उपक्रमासाठी देहूगावात साडी संकलनाचे कार्य सुरू आहे यास ग्रामस्थ बंधू-भगिनींकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.











Leave a Reply