Maharashtra News : डॉ.अंकुश जाधव यांच्याकडून शाळेस पुस्तकांची भेट

Maharashtra News : डॉ.अंकुश जाधव यांच्याकडून शाळेस पुस्तकांची भेट

Pckhabar- प्राथमिक शाळा,आसद येथील शाळेच्या वाचनालयास डॉ. अंकुश जाधव व डॉ. सुमित्रा जाधव यांचे नुकतेच प्रकाशित झालेले “श्री. गणेशाच्या आवडत्या वनस्पती”हे भेट म्हणून दिले. यात गणेशाला आवडणाऱ्या २१ वनस्पतींचा समावेश आहे. याचा शाळेतील विद्यार्थी व स्टाफला उपयोग होईल.

या प्रसंगी सोनहीरा साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते श्री.पी. सी. सर, आसद सोसायटीचे अध्यक्ष श्री. अंकुश जाधव, माजी अध्यक्ष श्री. संजय जाधव, माजी संचालक श्री.तानाजी जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सूर्यकांत जगदाळे सर व अन्य शिक्षक,”खबरे आजतक”चे पत्रकार श्री.संपत जाधव उपस्थित होते.

डॉ. अंकुश जाधव यांची ६० हून अधिक पुस्तके व ५००पेक्षा अधिक लेख विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, शास्त्रोक्त जर्नल्स मधून प्रकाशिक झाले असून ते भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सेवानिवृत्त सहायक संचालक आहेत.

विद्यार्थी विकास विद्यालय, मोहिते वडगांव येथील शाळेस त्यांनी “श्री.गणेशाच्या आवडत्या वनस्पती”व स्वातंत्र्य सैनिक स्व. ज्ञानदेव जाधव उर्फ जाधव मामा यांचे डॉ. अंकुश जाधव यांनी संपादित केलेले “सोनहीरा” हे आत्मवृत्त पुस्तक भेट दिले. सोनहीरा पुस्तकात स्वातंत्र संग्रामातील आठवणी, पोवाडे, अभंग, भेदीक गाणी व लावण्या यांचा समावेश आहे.

वडगाव येथील कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मांडके सर, मोहिते वडगाव सोसायटी चे अध्यक्ष श्री. विठ्ठल मोहिते, सामाजिक कार्यकर्ते श्री. कृष्णा पवार,”खबरे आजतक”चे पत्रकार श्री.संपत जाधव, श्री. संतोष कुंभार व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *